रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 20 मे 2020 (16:09 IST)

मंत्रालयात पुन्हा कोरोना

मंत्रालयातील आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाली आहे. सदरचा संबंधित अधिकारी राहत असलेली चर्चगेट इथली यशोधन इमारत सील करण्यात आली आहे. यशोधन इमारतीत राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी राहतात. यशोधन इमारत सील केल्याने इमारतीत राहत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहेत.दुसर्‍या IAS अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. या आधी मंत्रालयातील एका प्रधान सचिवांसह सहा जण कोरोना बाधित झाले होते. आता मंत्रालयातील बाधितांचा आकडा सातवर पोहोचला आहे.